top of page
IMG-20200127-WA0057.jpg

माध्यमिक  विभाग

 जून १९६६ 
सरस्वती सेकंडरी स्कूल ही केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम शाळांपैकी एक शाळा म्हणून ओळखली जाते. अर्थातच ही शाळा ठाणे शहराचे भूषण आहे . इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला दिमाखाने तोंड देऊन शालेय अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा , सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. सातत्यपूर्वक गुणवत्तेच्या आधाराने १९७३ सालापासून शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय मंडळात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. उच्चशिक्षित आणि कर्तव्य तत्पर शिक्षक वर्ग हे नेहमीच सरस्वती सेकंडरी स्कूलचे वैशिष्ट्य आहे विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात व यश प्राप्त करतात अभ्यासपूर्ण पूरक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विविध अंगांनी फुलवले जाते.
khotra sir_edited.jpg

मुख्याध्यापक 

श्री. भरत खोटरा 

saraswatischool1967@gmail.com

विशेष मानदंड

  • स्थापना – १९५२  : सरस्वती मंदिर ट्रस्टद्वारे प्राथमिक शाळेची स्थापना.

  • संस्थापिका : कै. विमलाताई कर्वे, कै. चि. श्री. कर्वे आणि कै. ग. ना. गाजरे यांच्या प्रयत्नातून शाळेची सुरुवात.

  • परंपरेचा वारसा : संस्थापिका विमलाताई कर्वेंच्या आदर्शांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण.

  • २०१८ – विशेष गौरव : पद्मभूषण ताराबाई Vlog विशेष संस्था पुरस्कार (पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तर).

  • २०१९ व २०२०  – सलग दोन वर्षे पुरस्कारप्राप्त : विंझकिंग संस्था आणि न्यूज 18 लोकमततर्फे ठाणे व नवी मुंबई विभागातील उत्कृष्ट मराठी माध्यम प्राथमिक शाळा पुरस्कार.

bottom of page