top of page

२०२५ - २०२६ मधील कार्यक्रम 

शैक्षणिक वर्ष २०२५ –२६  हे सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेसाठी उपक्रमांनी समृद्ध ठरले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेल्या वार्षिक gathering मध्ये नृत्य, नाट्य, संगीत आणि सादरीकरणांनी सर्वांची मने जिंकली. सांस्कृतिक उपक्रमांतून भारतीय परंपरा, सण आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संगम घडवण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि टीमवर्कची अधिक वाढ झाली. वर्षभर चाललेल्या उपक्रमांनी शाळेचे वातावरण उत्साही, सृजनशील आणि प्रेरणादायी बनवले.

logo_edited.jpg
अमृत महोत्सवी वर्ष  - शुभारंभ सोहळा 
​शनिवार दि. ६ जून २०२६ 

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साहपूर्ण व भावस्पर्शी शुभारंभ

ठाणे, दि. ६ जून :

१९५२ साली स्थापन झालेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ विश्वस्त, माजी विद्यार्थी, शिक्षक, आणि हितचिंतकांच्या अभूतपूर्व उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या पंचाहत्तर वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला उजाळा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, असा ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अधिकृत वेबसाईट तसेच अमृत महोत्सवी विशेष वेबपेजच्या उद्घाटनाने झाली. यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात जुन्या शाळेच्या परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांच्या आठवणींशी निगडित असलेल्या चिंचेच्या वृक्षाच्या स्मरणार्थ चिंचेचे रोप लावण्यात आले. या उपक्रमाने अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले.

अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त संस्थेच्या प्रारंभीच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ब्राह्मण सेवा संघ आणि उमा निळकंठ व्यायाम शाळा या संस्थांना कृतज्ञता पत्र प्रदान करून त्यांच्याप्रती आदर आणि ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला. हा सोहळा विशेष भावपूर्ण ठरला.

Smt. Karve Bai Photo.jpeg
कै. श्रीमती विमलाताई कर्वे स्मृतिव्याख्यान 
   

“विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे” – डॉ. आनंद नाडकर्णी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापिका आदरणीय कै. विमलाताई कर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी कै. श्रीमती विमलाताई कर्वे स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.कै .श्रीमती विमलाताई कर्वे यांनी दि. ६ जून १९५२ रोजी प्राथमिक शाळा सुरू केली. दि. ६ जून २०२६ ते दि. ६ जून २०२७ हे शाळेचे ‘ अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभाची मुहूर्तमेढ कै .श्रीमती विमलाताई कर्वे यांच्या स्मृतिदिन समारंभाचे औचित्य साधून रोवली गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची ‘प्रकट मुलाखत,शाळेची माजी विद्यार्थिनी सौ. हर्षदा बोरकर यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.  

IMG_6871.JPG
अमृत महोत्सवी वर्ष 

सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा कै. विमलाताई कर्वे यांनी दि . ६ जून १९५२ रोजी सुरु केली. आपल्या या  शाळेला २०२७ मधे पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत.

यासाठी दि. ६ जून २०२६ ते दि. ६ जून २०२७ या दरम्यान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे सरस्वती मंदिर ट्रस्टच्या माननीय विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.

bottom of page