
सरस्वती मंदिर ट्रस्ट

ललित कला अकादमी
सरस्वती मंदिर ट्रस्ट अंतर्गत ललित कलांची जोपासना करण्यासाठी ‘ललित कला अकादमी ’ कार्यरत आहे. अकादमी व कलाप्रांगण ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने भरतनाट्यम् व कथ्थक या शास्त्रीय नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाते. भरतनाट्यम् नृत्यामुळे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकास साधला जातो, तर कथ्थक नृत्यात लय, ताल व भावअंगाचे सुंदर दर्शन घडते. अनुभवी व पात्र गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गांधर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते व विविध ठिकाणी सादरीकरणाच्या संधी दिल्या जातात. ६ वर्षांवरील सर्वांसाठी नृत्यशिक्षण उपलब्ध आहे.
.jpg)

भरतनाट्यम्
सरस्वती मंदिर ट्रस्ट अंतर्गत ललित कलांची जोपासना करण्यासाठी राबवला जाणारा उपक्रम 'ललित कला अकादमी'. ललित कला अकादमी व कलाप्रांगण ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमात भरतनाट्यम् नृत्याचे वर्ग घेतले जातात.
सात शास्त्रीय नृत्य शैलीं पैकी सुप्रसिद्ध अशी भरतनाट्यम् नृत्य शैली मुळतः भारतातील दक्षिण भागात उगम व जगप्रसिद्ध झाली. भावनांची अभिव्यक्ती शरीर सौष्ठव व पोशाखातील देखणे स्वरूप यामुळे अर्थातच हि शैली सौन्दर्यपूर्ण आहे. या नृत्य प्रकारचे मानसिक, शारीरिक, बौद्धिक व आध्यत्मिक स्तरावर अनेक चांगले संस्कार होतात.
ललित कला अकादमातील भरतनाट्यम नृत्य वर्ग मुलांमध्ये कलाशिक्षणातील हेच रुजवण्याचा प्रयत्न करते. या वर्गात साध्य २९ विद्यार्थिनी भरतनाट्यम नृत्य वर्गाचे शिक्षण घेत आहेत. या नृत्य विद्यार्थिनींची गंधर्व महाविद्यलयाच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
भरतनाट्यम नृत्य वर्गाची शिक्षिका कु. रश्मी किर्लोस्कर हि नृत्य विशारद असून, B.A . आर्टस् आहे. संगीताची मुळातच विशेष जण असलेली रश्मी ताई, कर्नाटकी संगीताचे प्रशिक्षण घेत आहे
कथ्थक
मी नृत्यालंकार सौ.अपर्णा अजित पेंडसे.
माझ्या गुरुवर्या सौ. रेखा नाडगोडा, सुश्री मुक्ताताई जोशी, श्रीमती आशा जोगळेकर व सौ. मंजिरी देव यांच्या आशीर्वादाने सरस्वती विद्या मंदिर, नौपाडा, ठाणे येथे गेली २५ वर्षे मी कथ्थक नृत्याचे क्लास घेत आहे.
कथक नृत्य ही भारताला उत्तर भारताकडून लाभलेली एक शास्त्रीय नृत्य शैली आहे. हिचा उगम कधी झाला ते माहित नाही परंतु शंकराचा डमरुनाद व कृष्णाच्या बासरी इतकी ही कला प्राचीन आहे. कथ्थक नृत्यात लय व तालाचा सुंदर मिलाप दिसतो तसेच यामध्ये भावअंगही सादर केले जाते.आपल्या दिग्गज पंडितांनी कथ्थक वर खूप संस्कार केले आहेत व त्याची जोपासना केली आहे. गुरुपरंपरेचा वारसा आजची त्यांचे शिष्य जोपासत आहे.
सरस्वती ललित कला अकादमी नृत्यवर्गात शुद्ध कथक नृत्य व कथ्थक नृत्यावर आधारित सेमी क्लासिकल गाणी शिकविले जाते. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षांना बसविले जाते. संस्थेतील अनेक विद्यार्थिनी, विशारद व अलंकार विशेष श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा सभाधीटपणा वाढावा व त्यांना सादरीकरणाची सवय व्हावी म्हणून आमच्या संस्थेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सादर केले जातात. कथ्थक रंग - भूपाळी ते भैरवी, लोकनृत्य ते शास्त्रीय नृत्य, नृत्यविविधा,ऋतुरंग, 'ॐनमो भगवते वासुदेवाय' ही नृत्यनाटिका असे अनेक कार्यक्रम आम्ही मधुरांगण, रोटरी, द्वारकाधीश मंदिर.आपटा फाटा, घंटाळी सहयोग मंदिर,कौपिनेश्वर मंदिर.नववर्ष स्वागत यात्रा,उपवन फेस्टिवल,सी.के.पी.हॉल,चेंबूर,शिर्डी,नवदुर्गा विश्वजननी मंदिर ,लॉस एंजलिस,दि हिंदू टेम्पल ऑफ मिनियासोटा,मिनियापॉलिस,अमेरिका, अशा विविध ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत.
वय वर्ष ६ पासून सर्वांना आपला नृत्याचा छंद जोपासता येणार आहे. आपणही या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
.jpg)








