
सरस्वती मंदिर ट्रस्ट


विद्यादेवी नमितो तुजला I दे ना आम्हा विद्या तू II
सुगंध देऊ या जगताला I प्रसन्न हो गे आम्हा तू II
कै.मा.श्रीमती विमलाताई कर्वेबाई
संस्थापिका व विश्वस्त

मन:पूर्वक अभिनंदन
सरस्वती मंदिर ट्रस्ट 'वेब' साईटच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संपर्क साधताना मनापासून आनंद होत आहे. आधुनिक संपर्क माध्यमाचा प्रभावी वापर परस्परांना प्रगतीचा मागोवा घेण्यास तसेच नवनवीन तसेच नवनवीन कल्पना / विचारांच्या आदान-प्रदानास उपयुक्त ठरेल या विश्वासासह सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री. अशोक टिळक
गौरवशाली ७५ वर्षे
दि. ६ जून १९५२ रोजी सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेची स्थापना झाल्यापासून ही शाळा पुढे टप्प्याटप्प्याने वाढत गेली.
१९६६ मध्ये शाळा स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाली आणि ‘सरस्वती सेकंडरी स्कूल’ सुरू झाले. कर्वे बाई व पुढे टिळक सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेने मोठी प्रगती करत आज वटवृक्षाचे रूप घेतले आहे, ज्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत.
गेल्या काही दशकांत संस्थेने इंग्रजी माध्यम, क्रीडा, विज्ञान, कला, भाषा संलग्न अशा विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. वाढत्या गरजांनुसार नवीन इमारतीही उभारण्यात आल्या आहेत.
अमृत महोत्सवी वर्षात ‘स्नेह, संवाद आणि सन्मान’ या मूल्यांवर आधारित सर्वांगीण, सक्षम व आधुनिक शिक्षण देणारे विद्या संकुल उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
सुरेन्द्र दिघे
कार्यकारी विश्वस्त - सरस्वती मंदिर ट्रस्ट
![Mr.Surendra Dighe [ Managing Trustee]](https://static.wixstatic.com/media/e2be30_09ba9616e0264f8a93822911e7e63ddd~mv2.png/v1/crop/x_85,y_0,w_283,h_379/fill/w_275,h_367,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_avif,quality_auto/Mr_Surendra%20Dighe%20%5B%20Managing%20Trustee%5D.png)







